शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

तुझ्यासाठी जीव याचा आज ही जळतो आहे . . .

कळत नाही मला
कशात अर्थ अन् काय व्यर्थ आहे
पण एक तर्फी प्रेमात खरच
प्रित की दु्ख आहे

चकोर जसा चंद्रासाठी
पतंग जसा दिव्यासाठी
तो तसा तुझ्यासाठी
अन् तु . . . कधी कळलीच नाहीस

चातकास ओढ पहिल्या पावसाची
शिंपल्यास स्वातीच्या एका थेंबाची
त्यास ओढ तुझ्या चाहुलाची
अन् हर्षाने आभाळास गवसण्याची

किती ही केले तरी
प्रेमास काही यश नाही
अन् प्रेमाच्या या ओढीत
विरहास काही अंत नाही

आठवणींत तुला हा
आज ही स्मरतो आहे
तुझ्यासाठी जीव याचा
आज ही जळतो आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा