सोमवार, २ जानेवारी, २०१७

अन वेळे अगोदरच आज . . .

किती साम्य आहे
या डोळ्यात अन त्या मेघात,
दोघेही बरसतात
कोणाच्या तरी वेडात.

               तू दुरावलीस मजपासून
               अन तो या भू-पासून
               मज वेड तुझ्या प्रीतीचे
               अन त्यास भू-च्या भेटीचे

दोघांचाही विरह
दोघांस सोसवत नाही
अन दोघेही बरसतात
कोणाच्या तरी आठवणींत

               मज त्याने पाहिले
               अन सहज विचारले
               दोघांच्याही विरहात
               फरक काय आहे

मी त्याकडे पहिले
अन किंचित हसत म्हटले
माहित नाही मित्रा
पण एक सांगावेसे वाटते

               तुझा हा विरह
               काही काळाचा हा खेळ आहे
               अन माझा हा विरह
               ना शमणारी तहान आहे

तुझे बरसने हा
तुझ्या विरहाचा अंत असेल
अन माझे बरसने
माझ्या भावनांचा पूर असेल

               ऐकून माझे हे बोल 
               कदाचित तोही दुखावला 
               अन वेळे अगोदरच आज 
               तो पाऊस होऊन बरसला . . . 

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

तुझ्यासाठी जीव याचा आज ही जळतो आहे . . .

कळत नाही मला
कशात अर्थ अन् काय व्यर्थ आहे
पण एक तर्फी प्रेमात खरच
प्रित की दु्ख आहे

चकोर जसा चंद्रासाठी
पतंग जसा दिव्यासाठी
तो तसा तुझ्यासाठी
अन् तु . . . कधी कळलीच नाहीस

चातकास ओढ पहिल्या पावसाची
शिंपल्यास स्वातीच्या एका थेंबाची
त्यास ओढ तुझ्या चाहुलाची
अन् हर्षाने आभाळास गवसण्याची

किती ही केले तरी
प्रेमास काही यश नाही
अन् प्रेमाच्या या ओढीत
विरहास काही अंत नाही

आठवणींत तुला हा
आज ही स्मरतो आहे
तुझ्यासाठी जीव याचा
आज ही जळतो आहे